दिल्ली निवडणुकीसाठी 5 कोटी जमवणार
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठी आम आदमी पक्षाने (आप) मुंबईसह देशभरातील महानगरांत निधी उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या ‘डिनर’मधून पक्षाने तब्बल 91 लाखांची घसघशीत रक्कम उभारली.
2क् हजार मोजा आणि अरविंद केजरीवालांसोबत जेवणाच्या पंक्तीत बसा, अशी योजना पक्षाने आखली होती. मुंबईतील हिरे व्यापारी, चित्रपट निर्माते आणि आयटी क्षेत्रतील मंडळींनी यात सहभाग नोंदविला. या ‘हाय डिनर’ जेवणावळीतून पक्षाने तब्बल 91 लाखांचा निधी उभारला. ‘आप’च्या महाराष्ट्र शाखेने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी 5 कोटींचा निधी उभारण्याचा निश्चय केला आहे. मुंबईतील कार्यक्रमातून 91 लाख उभारण्यात आले असून, जेवणाच्या विशेष पासच्या माध्यमातून 36 लाख, धनादेशाद्वारे 36 लाख रुपये मिळाले. तर पक्ष कार्यकत्र्यानी विविध ठिकाणांहून 21 लाख रुपये गोळा केल्याची माहिती ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी दिली. (प्रतिनिधी)