Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोराई बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला जीवरक्षकांनी वाचवले

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 26, 2024 13:44 IST

बुडत असतांना त्यांनी तिला वाचवत पाण्या बाहेर काढले आणि गोराई पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती या जीवरक्षकांनी दिली.

मनोहर कुंभेजकरमुंबई-गोराई बीचवर आज सकाळी ११ वाजता भाईंदर येथील २३ वर्षीय एक तरुणी आत्महत्येचा  प्रयत्न करत छाती इतक्या खोल पाण्यात उतरली होती.तीच्या नाका तोंडात पाणी जायला लागले, ती गटांगळ्या खात होती आणि महाकाय लाटा तिला आपल्या कवेत घेत होत्या.

सदर घटना येथे तैनात असलेले जीवरक्षक अशोक बहोता, एकनाथ समरे आणि मंगलदास खटेले यांच्या लक्षात आले.त्यांनी त्वरित पाण्यात उड्या मारत आणि सूर मारत या तरुणीच्या जवळ पोहचले.तिला बुडत असतांना त्यांनी तिला वाचवत पाण्या बाहेर काढले आणि गोराई पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती या जीवरक्षकांनी दिली.