Join us  

हीच ती माणुसकी! मुंबईतील डॉक्टरांनी वाचविला कर्नाटकातील चिमुकल्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 8:02 AM

हृदयाचा होता दुर्मिळातील दुर्मीळ आजार, हृदय ऑक्सिजनयुक्त किंवा ऑक्सिजनरहित होण्याचा धोका असतो 

मुंबई : हृदयातील धमन्या चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेल्याने हृदयविकार जडलेल्या कर्नाटकातील बाळाचा मुंबईतील डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे जीव वाचला आहे.  कर्नाटकहून थेट मुंबईत उपचारांसाठी आलेल्या या बाळाची स्थिती अत्यंत नाजूक व दुर्मीळ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हृदय ऑक्सिजनयुक्त किंवा ऑक्सिजनरहित होण्याचा धोका असतो. त्याचसोबत त्याच्या हृदयात एक मोठे छिद्र होते आणि एका व्हॉल्व्हला रक्तप्रवाह अधिक होता. त्यामुळे अगदी छोट्या प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. यावर मार्ग म्हणून सुरुवातीला एक शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळ तीन वर्षांचे झाल्यावर त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करून त्याचे आयुर्मान वाढण्यास मदत झाली. या बाळाला सीटीजी करेक्टेड ट्रान्सपोझिशन ऑफ ग्रेट आर्टरिज हा एक जटिल हृदयविकार होता. हा अत्यंत दुर्मीळ आजार असून, दहा हजारांमध्ये एकाला त्याचे निदान होते. 

तब्बल १६ तास शस्त्रक्रियाबालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. पराग भलगट यांनी याविषयी सांगितले की, बाळावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बाळाला घरी पाठविण्यात आले असून, सध्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेचा कालावधी तब्बल १६ तासांचा होता. रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन या विशेषज्ज्ञांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. यासाठी रुग्णालयाच्या डॉ. जेरिल कुरियन, डॉ. भरत दळवी यांनी मोलाचे योगदान दिले.

टॅग्स :डॉक्टरकर्नाटक