Join us

आनंद नगर मेट्रो रेल्वेच्या खांबावर अडकलेल्या मांजराला अखेर वाचवले!

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 6, 2025 21:10 IST

मेट्रो आनंद नगर स्थानकांवरून मेट्रो स्टाफ सोबत अग्निशमन दलाचे जवानां ट्रॅक्स वर काही अंतर चालत गेले.

मुंबईगेल्या गुरुवार ते शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजे पर्यंत तब्बल दीड-दोन दिवस मेट्रोच्या दहिसर पूर्व येथील आनंद नगर मेट्रो स्थानकाच्या खांब्यावर ४० फूट ची उंचीवर अडकलेल्या मांजराला दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी अखेर वाचवले!

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तब्बल दीड दोन दिवस येथील मेट्रोच्या खांबावर एक मांजर बसले होते.मात्र  मांजरीला भूक लागल्यावर मध्य रात्रीच्या वेळी तीचे ओरडण्याचे आवाज आले.येथील लगतच्या सोसायटीच्या नागरिकांना मांजर दिसले. थोड्या थोड्या वेळाने मांजर आवाज करून लपून बसत होते.

या मांजरीची सुटका करण्यासाठी शुक्रवारी रात्री पुन्हा मांजर दिसल्यावर स्थानिक सामाजिक कार्यकर्ता राजेश पंडया यांनी मेट्रो रेल्वे स्थानकांचे अधिकारी सूर्यकांत हनवटे यांना रात्री दहा वाजता फोन वर संपर्क साधून मांजरां बाबतीत माहिती दिली. मेट्रो रेल्वे प्रवासी सेवा चालू असताना २५ हजार हाय वोलटेज विद्युत लाईनवर कामे करु शकत नाही,मात्र मध्य रात्री १२ वाजता नंतर विद्युत पुरवठा बंद झाल्यावर या मांजरीची सुटका करण्याची तयारी सुरू झाली.

 राजेश पंडया व विवेक निचाणी यांनी अग्निशमन दलानां संपर्क साधताच,गेल्या शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता अधिकार्यांनी घटना स्थळाचा निरीक्षण केली. मेट्रो अधिकाऱ्यांच्या सूचनेचा प्रतीक्षेत अग्निशमन दलाच्या जवानांची टीम तयार केली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी सेवांचा कामे करणारी स्थानिक युवा मंडळी हातात चादरी  पकडून खाली उभे होते.तर  एक रुग्णवाहिका सुद्धा तैनात होती.दहिसर पोलीस ठाण्याचे पोलिस व मेट्रोचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी हजर झाले. सदर घटना पाहायला नागरिकांनी गर्दी केली. 

मेट्रो आनंद नगर स्थानकांवरून मेट्रो स्टाफ सोबत अग्निशमन दलाचे जवानां ट्रॅक्स वर काही अंतर चालत गेले. ट्रॅक्स वरचा सुरक्षा भिंती वरुन खाली उतरले,आणि खूप मेहनतीने मेट्रोच्या खांबावर वर अडकलेले मांजरांना हूक्स मध्ये अडवून सुखरूपपणे हाताने धरून खाली आणले होते.दोन तासांनंतर रात्री सुमारे  १.३० वाजता सदर बचाव कार्य पार पडले. मेट्रोच्या पोल वर मांजर कशी पोहाचली असा सवाल उपस्थित झाला आहे. या मांजरीचा जीव वाचवून तीला सुखरूप बाहेर काढल्या बद्धल राजेश पंडया आणि विवेक निचाणी यांनी बचाव कार्यात मदत करणाऱ्या सर्वाचे आभार मानले.

टॅग्स :मुंबई