Join us  

राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे ९८ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:05 AM

दिवसा उन्हाचा तडाखा आणि दोन दिवसांपासून ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : दिवसा उन्हाचा तडाखा आणि दोन दिवसांपासून ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यूसह स्वाइन फ्लूच्या तापाचाही संसर्ग वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात स्वाइन फ्लूमुळे ९८ रुग्णांचे बळी गेले आहेत. शिवाय या रुग्णांची संख्या १, २५० वर येऊन ठेपली आहे.राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूर, अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू झाले. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल आहेत. राज्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल स्वाईन फ्लूचे ९४ बळी गेले असून १० एप्रिलपर्यंत १,२३६ रुग्ण आढळले.

टॅग्स :स्वाईन फ्लू