Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ९,७९८ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात शुक्रवारी ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १४,३४७ रुग्ण बरे झाले असून, ...

मुंबई : राज्यात शुक्रवारी ९ हजार ७९८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १४,३४७ रुग्ण बरे झाले असून, १९८ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यभरात सध्या १ लाख ३४ हजार ७४७ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ५४ हजार ५०८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तब्बल ५६ लाख ९९ हजार ९८३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५.७३ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९० लाख ७८ हजार ५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ५४ हजार ५०८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ५४ हजार ४०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ४ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्य

आजचा मृत्यूदर - १.९६ टक्के

आजचे मृत्यू - १९८

आजचे रुग्ण - ९,७९८

सक्रिय रुग्ण - १,३४,७४७