Join us

राज्यात बुधवारी ९,७७१ कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:06 IST

९,७७१ नवीन रुग्णांचे निदानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात ...

९,७७१ नवीन रुग्णांचे निदान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात बुधवारी ९,७७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १४१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात एक लाख १६ हजार ३६४ रुग्ण सक्रिय आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या चार कोटी १६ लाख ३७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ६१ हजार ४०४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख १७ हजार ९२६ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत तर ४,१७३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी १० हजार ३५३ करोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५८ लाख १९ हजार ९०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के इतके आहे.