Join us

ठाणे-पालघरच्या १० गावांतील अल्पसंख्याक सुविधांसाठी ९६ लाख

By admin | Updated: January 17, 2015 23:16 IST

योजनेंतर्गत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने ९५ लाख ९५ हजार ८७७ रुपयांचा निधी मंजूर केला

नारायण जाधव ल्ल ठाणे राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवून त्या समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या योजनेंतर्गत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने ९५ लाख ९५ हजार ८७७ रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ यानुसार, ठाणे आणि नव्या पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १० गावांत हा निधी रस्ते, गटारबांधणी, सार्वजनिक सभागृह आणि शादीखान्याच्या बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या अहवालानुसार खर्च करण्यात येणार आहे़ यात ठाणे जिल्ह्यातील पाच तर पालघर जिल्ह्यातील पाच गावांचा समावेश आहे़अशी होणार विकासकामे -४मुरबाड तालुक्यातील भुवन गावातील बौद्ध समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी ९ लाख ४६ हजार ४३० रुपये४शहापूरच्या डोळखांब गावात मुस्लिम समाजबांधवांसाठी सार्वजनिक सभागृहाच्या बांधकामासाठी १० लाख४कल्याणच्या म्हारळ गावात मुस्लिम समाजासाठी सार्वजनिक सभागृह १० लाख, रस्ता काँक्रिटीकरण (देशमुखनगर) २ लाख ९६ हजार ३२४, गटार बांधकाम (देशमुखनगर) २ लाख ३१ हजार १३३, रस्ता काँक्रिटीकरण (लक्ष्मीनगर) ६१ हजार ६६०, गटार बांधकाम (लक्ष्मीनगर) ४२,३३० रुपये४भिवंडी तालुक्यातील महापोली येथे मुस्लिम समाजासाठी शादीखान्याचे बांधकाम १० लाख अन् राहूर येथे कब्रस्तान भिंत बांधण्यासाठी १० लाख४पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या पोखरण येथे बौद्ध समाजासाठी आंबेडकर स्मशानभूमीपर्यंत रस्ता, संरक्षण भिंत आणि इतर सुविधांवर १० लाख ४वसई तालुक्यातील टेंभी-कोल्हापूर येथे ख्रिश्चन समाजबांधवांसाठी मुझैला आळी, कुंभारवाडा आणि टक्कापाडा-अंगणवाडी रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी १० लाख४वाळसई येथे ख्रिश्चन समाजासाठी सिमेंट रस्ता आणि गटार बांधण्यासाठी प्रत्येकी ५ लाख४तरखड येथे ख्रिश्चनबांधवांच्या वस्तीत रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटार बांधकामावर १० लाख ४अर्नाळा येथे ख्रिश्चन वस्तीत पारनाका येथे शौचालय आणि मुतारी बांधण्यासाठी १० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे़४ही सर्व कामे संबंधित ग्रामपंचायतींनी अल्पसंख्याक विभागाच्या निकषानुसार पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवायचा आहे़