जमीर काझी - मुंबई
भ्रष्ट अधिका:यांच्या संगनमताने शासनाची कोटय़वधींची फसवणूक कशी करतात, याचे आणखी एक उदाहरण चव्हाटय़ावर आले आहे. जुहूतील प्रसिद्ध जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर दुसरे ‘कॅम्पाकोला’ बनले असून या ठिकाणी 93 टक्के दुकान गाळे व पार्किगमध्ये अनधिकृतपणो बांधकाम केल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. पार्किगच्या जागेमध्ये राजरोसपणो परमिट रूम व बीअर बार सुरु असल्याचे प्रशासनाने दिलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे.
म्हाडा व महापालिकेतील भ्रष्ट साखळीतून गेल्या 1क् वर्षामध्ये झालेल्या बेकायदेशीर विक्री, व्यवहारातून एकीकडे शासनाचा कोटय़वधीचा महसूल बुडवला गेला असताना दुसरीकडे या अनधिकृतपणो बांधकामामुळे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था फाटय़ावर बसली आहे.
म्हाडाने जुहूमध्ये जे.व्ही.पी.डी. रोड येथील स्वत:च्या मालकीच्या जागेमध्ये 3क् वर्षापूर्वी 3 मजली (जी प्लस 3) इमारत व्यावसायिक तत्त्वावरील वापरासाठी जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर बांधून पार्किगसह एकूण 93 गाळे विकले होते. गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणच्या गाळ्यांची परस्पर विक्री, हस्तांतरण आणि त्यांच्या बांधकामात बदल करण्यात आल्याबाबतची तक्रार मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी यांच्याकडे आली होती. त्यानुसार त्यांनी शॉपिंग सेंटर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रशासकांना पूर्ण इमारतीच्या सद्य:स्थितीची तपासणी करुन अहवाल मागविला होता. त्यानुसार प्रशासनाने 24 जून ते 1 जुलै या कालावधीत सेंटरच्या 93 गाळ्यांची पाहणी केली. त्यामध्ये केवळ 7 गाळे नियमानुसार असून उर्वरित 86 गाळे व पार्किगच्या जागेत बांधकामामध्ये बदल केला आहे. अनेकांनी परस्पर पोटमाळे, दोन गाळ्याचे मिळून एक दुकान बनवले आहेत. त्याचप्रमाणो अनेक दुकान गाळे मूळ गाळेधारकाऐवजी अन्य व्यक्तींच्या ताब्यात असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. गाळ्याची परस्पर विक्री, बांधकामामध्ये फेरफार करताना म्हाडाची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यातून जवळपास कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाला आहे.
पार्किगमध्ये बीअर बार, ब्युटीपार्लर
च्जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटरच्या तळ मजल्यावर म्हाडाने एकूण 32 पार्किगचे गाळे बनवले होते. त्यापैकी 18 बंदिस्त तर 13 खुले व एक पार्किग इमारतीच्या मागच्या बाजूला होते. मात्र, सध्या त्यापैकी केवळ 5 अस्तित्वात असून उर्वरित ठिकाणी परमिट रूम, बीअर बार, ब्युटीपार्लर व स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. प्रत्येकाचा व्यवहार 4क्, 5क् लाख रुपयांमध्ये झाला असल्याचे सांगण्यात येते.
म्हाडा, महापालिकेतील काही भ्रष्टाचारी अधिका:यांच्या संगनमताने जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटरमध्ये बेकायदेशीरपणो फेरफार करुन कोटय़वधींचा महसूल बुडवण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेने 2क्क्6 मध्ये ते पाडण्याबाबत नोटीस बजावली असता त्या वेळी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन त्याची भरपाई देण्याची तयारी दर्शविल्यानंतर 4 महिन्यांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र आजतागायत त्याबाबत प्रशासनाकडून काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे मुंबई मंडळांचे सभापती युसूफ अब्राहनी यांनी सांगितले. या गैरव्यवहाराबाबत म्हाडाकडून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत उपाध्यक्ष सतीश गवई यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबत उद्या लेखी मागणी करणार असल्याचे अब्राहनी यांनी स्पष्ट केले.