Join us

९ फूट लांब अजगर पकडला

By admin | Updated: September 25, 2014 00:52 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी सायन पनवेल मार्गावर पकडलेल्या एका मादी अजगराची बुधवारी सुटका केली.

नवी मुंबई : अग्निशमन दलाच्या जवानांनी सायन पनवेल मार्गावर पकडलेल्या एका मादी अजगराची बुधवारी सुटका केली. मात्र त्यांच्या या प्रयत्नात मादी नरापासून दुरावली असून तिची अंडीही हरवली. अखेर एकाकी पडलेल्या मादी अजगराला महापे येथील डोंगरावर सोडून देण्यात आले.डी. वाय. पाटील स्टेडियमलगत सायन पनवेल मार्गाच्या सर्व्हिस रोडवर अजगर असल्याची माहिती नेरुळ अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन या अजगराला पकडले. यावेळी मादी जातीचे हे अजगर असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ज्या ठिकाणाहून हे अजगर पकडले तेथे काही अंडीही होती. पकडलेले हे अजगर काही वेळाकरिता नेरुळच्या अग्निशमन कार्यालयातच ठेवण्यात आले होते. या दरम्यान अजगराची अंडी घटनास्थळीच राहिली असल्याची बाब अग्निशमन जवानांच्या लक्षात आली. त्यानुसार ही अंडी शोधण्यासाठी ते पुन्हा त्या ठिकाणी आले असता तेथून अंडी गायब झाली होती. पकडलेले अजगर मादी असल्याने तिच्या नराने ही अंडी नेली असावीत असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यावरुन नेरुळच्या या आवारात दुसरा अजगर अद्यापही वावरत आहेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेऊनही सापडला नाही. अखेर पकडलेल्या ९ फूट लांबीच्या मादी अजगरा महापे येथील डोंगरावरील जंगलात सोडून दिल्याचे नेरुळ अग्निशमन अधिकारी अमृतानंद बोराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)