Join us

हार्बरवर ९ दिवस ब्लॉक; सीएसटी-अंधेरी पहिली लोकल रद्द

By admin | Updated: February 3, 2016 03:20 IST

हार्बरवरील सीएसटी स्थानकातील १२ डबा प्लॅटफॉर्म आणि मस्जिद येथील हार्बरच्या रिमॉडेलिंगसाठी मध्य रेल्वेकडून ३ ते ११ फेब्रुवारीपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे

मुंबई : हार्बरवरील सीएसटी स्थानकातील १२ डबा प्लॅटफॉर्म आणि मस्जिद येथील हार्बरच्या रिमॉडेलिंगसाठी मध्य रेल्वेकडून ३ ते ११ फेब्रुवारीपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री दीड ते पहाटे साडे चारपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्याने सीएसटी ते अंधेरी, वांद्रेदरम्यान पहाटेच्या पहिल्या लोकल रद्द करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. या ब्लॉक दरम्यान सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २चे काम केले जाईल. किरकोळ कामांसाठी हा ब्लॉक मध्यरात्री घेतल्यानंतरही रेल्वेकडून त्यानंतर ३ दिवसांचा सर्वांत मोठा ब्लॉकही घेतला जाणार आहे. या लोकल रद्द सीएसटी ते अंधेरी-स.४.२७सीएसटी ते वांद्रे- स.४.५२वांद्रे ते सीएसटी- स.४.३0अंधेरी ते सीएसटी-स.५.१७