Join us

विमानतळावर ८७ लाखांचे सोने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 04:50 IST

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातनळावर ८७ लाख ५१ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातनळावर ८७ लाख ५१ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाने ही कारवाई केली. बँकॉक येथून मुंबईला येत असताना, जितेंद्र बाबुलाल सोलंकी या प्रवाशाकडे दोन हजार ९९७ ग्रॅम वजनी सोने असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली. मुंबई विमानतळावर सोलंकीची तपासणी केली असता, त्याच्याकडील मोबाइलच्या कव्हरमध्ये सोने आढळून आले. सोलंकीकडील सोने जप्त करण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती कस्टम विभागाने दिली.