Join us

८६ मेट्रिक टन कचरा; ३८४ किलोमीटर लांबीचे रस्ते केले स्वच्छ

By जयंत होवाळ | Updated: April 20, 2024 20:36 IST

१ हजार ३३१ कामगार, कर्मचाऱ्यांची २०१ संयंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवली.

मुंबई : स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत शनिवारी ३८४ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले.सखोल स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून एकाच दिवसात १५० मेट्रिक टन डेब्रीज आणि ८६ मेट्रिक टन कचरा संकलन करण्यात आला. १ हजार ३३१ कामगार, कर्मचाऱ्यांची २०१ संयंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवली.

३८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर आधी ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली व नंतर ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा यावेळी दिमतीला होती. शनिवारी या ठिकाणी राबवली मोहीम - परिमंडळ १- महापालिका मार्ग, क्रॉफर्ड मार्केट परिसर, डॉक्टर मेशेरी मार्ग, खेतवाडी गल्ली, मंगलदास मार्ग, लोहार चाळ परिसर, मराठा मंदीर ते आनंदराव नायर मार्ग.

परिमंडळ २ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जे. के. सावंत मार्ग, हरिश्चंद्र येवले मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग.परिमंडळ- ३ न्यू इंग्लिश स्कूल मार्ग, रामकृष्ण परमहंस मार्ग, सरोजिनी मार्ग, महाकाली गुहा रस्ता ते जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता जंक्शन.

परिमंडळ- ४ अंधेरी रेल्वे स्थानक परिसर, लगून रस्ता, सुंदर नगर, अहिंसा मार्ग.परिमंडळ- ५ काजूपाडा जलवाहिनी मार्ग, अंधेरी कुर्ला जोडरस्ता, वैभव नगर.

परिमंडळ- ६ बाजार मार्ग, विक्रोळी उद्यान, प्रताप नगर मार्ग, हनुमान नगर मार्ग, बबनराव कुलकर्णी मार्ग, मिठागर तलाव.परिमंडळ ७ रंगनाथ केसरकर मार्ग, रिव्हर व्हॅली मार्ग, नवीन जोडरस्ता, खंडवाला मार्ग या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :मुंबई