Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८५,१८९ विद्यार्थ्यांनी दिला इंग्रजीचा पेपर

By admin | Updated: February 23, 2015 22:28 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांतील बारावीच्या एक लाख १६ हजार २९३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. यानुसार, सोमवारी विज्ञान, कॉमर्स, आर्ट्स या शाखांच्या सुमारे

ठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यांतील बारावीच्या एक लाख १६ हजार २९३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. यानुसार, सोमवारी विज्ञान, कॉमर्स, आर्ट्स या शाखांच्या सुमारे ८५ हजार १८९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. यादरम्यान, कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे शिक्षण विभागाद्वारे नमूद करण्यात येत आहे.यामध्ये विज्ञान शाखेच्या २५ हजार ४५७ विद्यार्थ्यांसह आर्ट शाखेच्या १४०१३, तर कॉमर्सच्या ४५२२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या पेपरच्या दरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)