Join us

माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध १० वर्षांत ८४ खटले

By admin | Updated: July 14, 2015 01:36 IST

गेल्या दहा वर्षांत राज्य माहिती आयोगाने जारी केलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात आत्तापर्यंत तब्बल ८४ प्रकरणांत खटले दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई : गेल्या दहा वर्षांत राज्य माहिती आयोगाने जारी केलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात आत्तापर्यंत तब्बल ८४ प्रकरणांत खटले दाखल करण्यात आले आहेत. यात एकाच प्रकरणात माहिती आयोगाला न्यायालयीन लढाईत यश मिळाल्याचे समोर आले आहे.माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली. ८४पैकी ३ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातील आहेत. २०१३ मध्ये २४ तर २०१४ मध्ये २३ प्रकरणे दाखल झाली. राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशाविरुद्ध गृह खाते, मुंबई विद्यापीठ, रिलायन्स एनर्जी, मुंबई महापालिका, पोलीस खाते, एस.डी. कॉर्पोरेशनसारख्या एजन्सींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)