Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंध निकिताला बारावीत 80 टक्के

By admin | Updated: May 30, 2017 18:11 IST

सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकणाऱ्या निकिता सोनवणे या अंध विद्यार्थिनीने बारावीमध्ये ८० टक्के गुण संपादित केले. निकीताची आर्थिक परिस्थिती बेताची असून तिची

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.30 - सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकणाऱ्या निकिता सोनवणे या अंध विद्यार्थिनीने बारावीमध्ये ८० टक्के गुण संपादित केले. निकीताची आर्थिक परिस्थिती बेताची असून तिची आई काबाड कष्ट करून तिला शिकवत आहे. 
मुंबईतील लालबाग येथील श्रीकृष्ण इमारतीमध्ये निकीता तिच्या आईसोबत भाड्याच्या घरात राहते. भाड्याच्या घरात राहतानाही ती दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत होती. तसेच, अभ्यासात मैत्रिणींची मदत झाल्याचे निकिता सांगते. 
सध्या तरी कला शाखेची पदवी  घेण्याचा मानस असून कला क्षेत्रात  उच्च शिक्षण घेण्याची प्रतिक्रिया निकिताने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.