Join us  

३६ तासांत 'त्या' तिघांमुळे आठ जणांना मिळालं जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 12:11 PM

ब्रेड डेड झालेल्या तीन व्यक्तींच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवं आयुष्य मिळालं.

मुंबई- 36 तासामध्ये तीन व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आठ जणांना जीवनदान दिलं आहे. ब्रेड डेड झालेल्या तीन व्यक्तींच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवं आयुष्य मिळालं. झोनल ट्रान्सप्लॅन्ट कॉर्डीनेशन सेंटर (झेडटीसीसी)च्या माहितीनुसार, 1 मे रोजी रात्री 3 वाजता तीन व्यक्ती ब्रेनडेड झाल्याची माहिती मिळली होती.

ब्रेन डेड झालेल्या तीन जणांमध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा सहभाग आहे. त्यापैकी एक व्यक्ती 67 वर्षीय असून दुसरी 45 वर्षीय आहे. 22 वर्षीय तरूणाला रस्ते अपघातात डोक्याला दुखापत झाली होती. या तिघांच्या अवयवदानामुळे आठ जणांना नवं आयुष्य मिळालं. 2017मध्ये मुंबईत 58 अवयवदाते होते. 2012मध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकेच अवयवदाते होते. ही संख्या आता वाढली आहे. 

1 मे रोजी ब्रेड डेड झालेल्या 22 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचं ह्रदय, यकृत आणि दोन किडण्या मीरारोडमधील उमराव वोकार्ड हॉस्पिटलमध्ये दिल्या. 45 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबाने त्यांचं यकृत आणि दोन किडण्या चर्नीरोडमधील सैफी हॉस्पिटलमध्ये डोनेट दिल्या तर 67 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांचं यकृत पेडर रोडमधील जसलोक हॉस्पिटलमध्ये दिलं. यामुळे आठ जणांना जीवनदान मिळालं.