Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुईगांवात ८ लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: May 25, 2014 00:18 IST

गुरूवारी रात्री वसई पुर्वेस चोरट्यांनी दणका दिला असताना शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे वसई पश्चिमेस चोरांनी दोन घरात शिरून कुटुंब झोपेत असतानाच घर लुटून नेले.

नायगाव : गुरूवारी रात्री वसई पुर्वेस चोरट्यांनी दणका दिला असताना शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे वसई पश्चिमेस चोरांनी दोन घरात शिरून कुटुंब झोपेत असतानाच घर लुटून नेले. यातील सांडोर येथील घरात कुटुंब निदे्रत असताना चोरट्यांनी घरात शिरुन चोरी केल्याची घटना घडली आहे. कार्मलाईट स्कुल, खराळे नजिक, राजेंद्र राऊत यांचे घर आहे. शुक्रवारी त्यांनी बँकेतून काही रक्कम स्वत:च्या गॅरेजच्या कामासाठी काढली होती. पहाटे २ च्या सुमारास घराच्या मागील बाजुस ग्रील उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील काँक्रीटच्या ३ बॅटस स्वत: सोबत घेऊन येथील कपाट फोडून त्यातील ३५ हजार रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकुण ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. ३ च्या सुमारास चोरीची माहिती मिळाल्यावर याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. विशेष म्हणजे या घराला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र चोरट्यांनी मागील बाजुने प्रवेश केल्याने त्याचा उपायोग होऊ शकला नाही. अन्य घटनेत भुईगांव येथील संत गोन्सालवीस नगर येथील स्वाती रोहन परेरा यांच्या मालकीच्या बंगल्याची टेरेसवरील ग्रील तोडून चोरट्यांनी आत शिरुन आतील ११,५०० रू. रोख रक्कम व दागिने असा तब्बल ८ लाख ३५ हजाराचा माल चोरून नेला. शुक्रवारी ८ ते रात्री १० वा. सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी घरातील सदस्य वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दोन्ही घटनांची नोंद वसई पोलीस ठाण्याला झाली असून अधिक तपास प्रभारी अधिकारी रेड्डी व पो. नाईक निकुंभे करीत आहेत. (वार्ताहर)