Join us  

पोलीस मॅरेथॉनसाठी मुंबईतील ७९ रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 5:20 AM

२३ रस्त्यांवर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईत रविवार, ९ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुंबईतील ७९ रस्ते बंद करण्यात आले आहेत. ३३ रस्त्यांवर नो पार्किंग असून १८ रस्ते पार्किंगसाठी, तर वाहतुकीसाठी २३ पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.७९ बंद रस्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, शहीद भगसिंग मार्ग, महात्मा गांधी मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, कूपरेज मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, मादाम कामा रोड, एन. एस. रोड, अ‍ॅनी बेझंट मार्ग, गोपाळराव देशमुख मार्ग, खान अब्दुल गफारखान रोड, हर्डीकर मार्ग, एस. व्ही. रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आदींचा समावेश आहे.तर नो र्पाकिंगच्या ३३ रस्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मादाम कामा रोड, एन. एस. रोड, अ‍ॅनी बेझंट मार्ग, गोपाळराव देशमुख मार्ग, हर्डीकर मार्ग, एस. व्ही. रोड. आदी रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय बॅ. रजनी पटेल मार्ग, एस. व्ही. पी. रोड, विधानभवन बाहेर, बॅलार्ड पिअर, वांद्रे रिक्लेमेशन डेपो, लोढा किंवा इंडियाबुल्स वाहनतळ अशा २४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल.शहीद भगतसिंग मार्ग (अतिमहत्त्वाच्या वाहतुकीसाठी), केशव खाडे मार्ग, मुंबई सेंट्रल रोड, सेनापती बापट मार्ग, रानडे मार्ग अशा एकूण २३ रस्त्यांवर पर्यायी वाहतुकीची व्यवस्था आहे. मॅरॅथॉनसाठी वाहतूक विभागाचे ६०० पोलीस अधिकारी तसेच ३०० ट्रॅफिक वॉर्डन आणि ३ हजार स्वयंसेवक असतील.४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किमीची अर्थ मॅरेथॉन, १० मैल किंवा १६ कि.मी. दौड आणि ५ किलोमीटरची टाइम रन अशा चार प्रकारांमध्ये या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण मॅरेथॉन गेट वे आॅफ इंडिया ते राजीव गांधी सागरी सेतू आणि पुन्हा अशी असेल. अर्ध मॅरेथॉन राजीव गांधी सागरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे आॅफ इंडिया येथे समाप्त होणार आहे. १० मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे आॅफ इंडियापर्यंत तर टाइम रन गेट वे आॅफ इंडिया ते एन.सी.पी.ए.पर्यंत असेल.