Join us

माजी मुख्यमंत्र्यांनी दाबल्या भ्रष्टाचाराच्या ७६ फाईल्स

By admin | Updated: October 28, 2014 11:15 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी भ्रष्टाचाराच्या ७६ फाईल्स दाबल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ -'स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री' अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिमा आता डागाळण्याच्या मार्गावर आहे. कारण महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराच्या ७६ प्रकरणांवर मौन बाळगत त्या दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांचा व अधिका-यांच्या फाईल्सचा समावेश असल्याचे म्हटले आहे. 
पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे आमदारस तसेच अनेक आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या सनदी अधिका-यांच्या फाईल्सवर मौन बाळगले. लाचलुचपत खात्याने नेते व अधिका-यांच्या विरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी मागितली होती, नियमानुसार तीन महिन्यांच्या आत ही परवानगी मिळायला हवी होती.  मात्र चव्हाणांनी त्यावर निर्णय घेण्यास उशीर करत ती प्रकरण झुलवत ठेवल्यामुळे अद्याप त्या प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. 
दरम्यान आता भाजपाचे नवीन सरकार राज्यात येऊन घातले असून या प्रकरणांमध्ये लक्ष घालून खुल्या चौकशीची व कारवाईची परवानगी देण्याचे आव्हान या सरकारसमोर असेल. नव्या सरकारला या प्रकरणांवर तातडीने निर्णय घ्यावा लागेल असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.