Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ५३८ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार १८७ (७३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात ५३८ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार १८७ (७३ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात गुरुवारी सर्वाधिक लसीकरण धुळे जिल्ह्यात (१११ टक्के) झाले असून त्या पाठोपाठ बीड, पालघर, नांदेड, सिंधुदूर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत २ लाख १९ हजार ६९६ कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात लसीकरणासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत, तर देशातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर असलेले पोलीस, लष्कर, होमगार्ड, कचरावेचक आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांना लस देण्यात येईल. त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार असलेल्या ज्येष्ठांना प्राधान्याने लस दिली जाईल. त्यानंतर पन्नाशीपुढील कोणताही आजार नसलेल्या ज्येष्ठांना लस टोचली जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या अंतराने दुसरा डोस देण्यात येईल.

----------------