मुंबई : रक्त पिशवी व चाचण्यांचे अधिक शुल्कआकारणा:या राज्यातील 72 विना सरकारी रक्तपेढय़ांना अन्न व औषध प्रशासनाने कारणो दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये मुंबईतील काही मल्टीस्पेश्ॉलिटी रुग्णालयांचा समावेश असल्याचे समजते.
ही नोटीस मुंबई (19), कोकण (7), पुणो (22), नागपूर (6) व नाशिक (18) येथील एकूण 72 रक्तपेढय़ांना बजावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाच्या या कारवाईत दोषी आढळल्यास रक्तपेढीचा परवाना काही काळासासाठी अथवा कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो. त्यामुळे कारवाईची ही टांगती तलवार नेमक्या कोणत्या रुग्णालयांवर हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
विना सरकारी रक्तपेढय़ांना राष्ट्रीय रक्त धोरणानुसार शुल्क आकारावे लागते. यासाठी राज्य शासनाने 26 जून 2क्14 रोजी परिपत्रक जारी केले. त्यानुसार या रक्तपेढय़ांमध्ये शुल्क आकारले जाते की नाही, याची शहानिशा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी चौकशी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत एकूण 3क्9 रक्तपेढय़ांपैकी 247 रक्तपेढय़ा मार्गदर्शक तत्त्वानुसारच शुल्क आकारत असल्याचे स्पष्ट झाले. यात औरंगाबाद व अमरावती येथील 6क् रक्तपेढय़ांचा समावेश असून इतर 72 रक्तपेढय़ांनी अधिक शुल्क आकारल्याची माहिती सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी दिली.