Join us

आर्थिक मदतीसाठी ७० हजार रिक्षा चालकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आर्थिक मदतीसाठी आतापर्यंत ७० हजार रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, तर गुरुवारपासून अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास परिवहन आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. पण परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक साहाय्य ही वेबलिंक सूरू केल्यानंतर भेट देणाऱ्यांच्या संख्येत लाखोंनी वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात पैसे अर्जदारांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी आयसीआयसीआय बँकेची नियुक्ती करण्यात आली आहे, असे परिवहन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.