Join us

गँगस्टर हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

By admin | Updated: June 10, 2015 04:17 IST

गँगस्टर अनिल पांडेच्या हत्येप्रकरणी ४ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यापाठोपाठ यामागील मुख्य सूत्रधार सौरभ बबन खोपडे (१८) सह आणखी तिघांना सोमवारी अटक करण्यास भांडुप पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : गँगस्टर अनिल पांडेच्या हत्येप्रकरणी ४ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यापाठोपाठ यामागील मुख्य सूत्रधार सौरभ बबन खोपडे (१८) सह आणखी तिघांना सोमवारी अटक करण्यास भांडुप पोलिसांना यश आले आहे.यापूर्वी घाटकोपर गुन्हे शाखेने समीर उर्फ चिंट्या विठोबा कदम (२६), रवींद्र ऊर्फ रवी रामभाऊ वानरे (२२), गौतम साहेबराव घाडगे (२५)आणि सागर विठ्ठल गवस (२६) या चौकडीला अटक केली होती. त्यापाठोपाठ भांडुप पोलिसांनी खोपडेसह, शुभम विनोद भोगले (१८) समीर चव्हाण (२१) या आरोपींना भांडुप कॉम्प्लेक्स परिसरातून अटक केली. सातही आरोपींचा ताबा भांडुप पोलिसांकडे असून सोमवारी न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सातही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून उर्वरित आरोपींचा तपासही सुरू असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)