Join us
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत ६८६ इमारती धोकादायक

By admin | Updated: June 19, 2015 00:21 IST

कल्याण - डोंबिवली महापालिकेंतर्गत येणाऱ्या सात प्रभाग समित्यांमध्ये एकूण ६८६ इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी २९१ या अतिधोकादायक असून ३९५ धोकादायक आहेत.

अनिकेत घमंडी , डोंबिवलीकल्याण - डोंबिवली महापालिकेंतर्गत येणाऱ्या सात प्रभाग समित्यांमध्ये एकूण ६८६ इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी २९१ या अतिधोकादायक असून ३९५ धोकादायक आहेत. यात सर्वात जास्त अतिधोकादायक १४८ इमारती या ‘क’ प्रभागात तर ‘फ’मध्ये १३६ धोकादायक इमारतींचा समावेश आहे. त्या खालोखाल ‘क’मध्येच आणखी ८४ इमारती धोकादायक असल्याचे प्राप्त आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. यापैकी अतिधोकादायक इमारतींवर तत्काळ कारवाइचे आदेश अतिरीक्त आयुक्तांनी संबंधित प्रभागाच्या उपायुक्तांसह प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याने संबंधित इमारतीधारकांना नोटीसा बजावल्या आहेत.संबंधित अधिकाऱ्यांना अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे चाळीत बैठी घरे खरेदी करु नये. महापालिका अशा बांधकामांना परवानगी देत नाही. घरखरेदीचे व्यवहार करतांना संबंधित नागरिकांनी महापालिकेच्या नगररचनाकार विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घर खरेदी करावी. तसेच धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमध्येही घरे घेऊ नयेत.- संजय घरत, अतिरीक्त आयुक्त केडीएमसी