Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीवायबीकॉमला ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: June 25, 2016 03:53 IST

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा (टीवायबीकॉम) सहाव्या सत्राचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा (टीवायबीकॉम) सहाव्या सत्राचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या एकूण ६९ हजार ५२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.याआधी ७० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील केवळ ७० हजार २८१ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यातून केवळ ६०९ हजार ५२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२१ विद्यार्थ्यांना ‘ओ’ ग्रेड मिळाली आहे. तर ७ हजार ८५७ विद्यार्थ्यांना ‘ए,’ १२ हजार २३० विद्यार्थ्यांना ‘बी’, १३ हजार २३२ विद्यार्थ्यांना ‘सी’, ७ हजार ५२७ विद्यार्थ्यांना ‘डी’ आणि ४५८ विद्यार्थ्यांना ‘ई’ ग्रेड मिळाली आहे. तर २० हजार ३१३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)