Join us

पाच दिवसांत ६५० रिक्षांची तपासणी

By admin | Updated: June 29, 2015 22:32 IST

आरटीओकडून १९ ते २० जून दरम्यान विशेष मोहिमेत साडेसहाशे रिक्षांची झाडाझडती घेतली. यामध्ये जवळपास दीडशे वाहने दोषी आढळली असून त्यापैकी

पनवेल : आरटीओकडून १९ ते २० जून दरम्यान विशेष मोहिमेत साडेसहाशे रिक्षांची झाडाझडती घेतली. यामध्ये जवळपास दीडशे वाहने दोषी आढळली असून त्यापैकी ३१ वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एकूण १०,६०० रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१४ रिक्षा दोषी आढळल्या त्यातून १११ रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत. आजतागायत ३१,९४,४३८ इतका दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून आरटीओ अधिकाऱ्यांनी गर्दीच्या वेळेस सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत पनवेल रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात जावून रिक्षांचा तपासणी केली. या सर्व रिक्षांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास भाग पाडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १५ ते २० जून या कालावधीत परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार विशेष तपासणी करण्यात आली. याकरिता परिवहन आयुक्त कार्यालय, पेण उपप्रादेशिक कार्यालयाचे प्रत्येकी एक व ठाणे प्रादेशिक कार्यालयाचे दोन अशा चार भरारी पथकाने रिक्षावाल्यांची झाडाझडती घेवून ९३,३२१ रु. दंड वसूल केला. (वार्ताहर )