Join us

मुंबई महापालिका शाळांमध्ये ६४७ बालवाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:22 IST

मुंबई : महापालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तामिळ, गुजराती, कन्नड, तेलगू या माध्यमांच्या ६४७ बालवाड्या सुरू आहेत. शाळांची ...

मुंबई : महापालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तामिळ, गुजराती, कन्नड, तेलगू या माध्यमांच्या ६४७ बालवाड्या सुरू आहेत. शाळांची एकूण संख्या लक्षात घेऊन आणखी वर्ग सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून, पालिकेच्या बालवाड्यांव्यतिरिक्त ३९६ बालवाड्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

सर्व बालवाड्यांमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आहे. निसर्गातील चित्ताकर्षक बाबींसोबतच कार्टुन्सदेखील रेखाटली आहेत. खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या बालवाड्यांमुळे विद्यार्थी गळती रोखण्यास मदत होत आहे. महानगरपालिकांच्या शाळांमधून बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका