लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४८६ दिवसांवर पोहोचला आहे. तर १८ ते २४ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ६ हजार १५९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत सोमवारी ३४८ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ६ हजार ३९३ झाली असून मृतांची संख्या ११ हजार ३०७ झाली आहे. तर दिवसभरात ५०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ८८ हजार २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या २७ लाख १७ हजार १९२ चाचण्या झाल्या आहेत.
शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १७३ झाली असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ८४ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १ हजार ७५७ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.
.................