Join us
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे ५९ हजार दिवस वैद्यकीय रजा

By admin | Updated: May 31, 2014 02:59 IST

तंबाखू चघळणे किती महागात पडू शकते, हे बेस्ट उपक्रमातील कर्मचार्‍यांनी वर्षभरात घेतलेल्या वैद्यकीय रजेवरून स्पष्ट झाले आहे

तंबाखूमुळे ५९ हजार दिवस वैद्यकीय रजा मुंबई : तंबाखू चघळणे किती महागात पडू शकते, हे बेस्ट उपक्रमातील कर्मचार्‍यांनी वर्षभरात घेतलेल्या वैद्यकीय रजेवरून स्पष्ट झाले आहे. बेस्ट उपक्रमाच्या आकडेवारीनुसार, तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे २०१३ मध्ये बेस्ट कर्मचार्‍यांनी एकूण ५९ हजार दिवस वैद्यकीय रजा घेतली होती तर ११८ कर्मचार्‍यांना सेवेत असतानाच रुग्णालयात दाखल करावे लागले होते. हे टाळण्यासाठी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि बेस्टने आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात बेस्ट कर्मचार्‍यांनी तंबाखूरहित बेस्टची घोषणा केली. ३१ मे हा दिवस तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने बेस्ट कर्मचार्‍यांमध्ये कर्करोग प्रतिबंधाच्या दृष्टीने जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आज बेस्टच्या कुलाबा येथील आॅडिटोरिअममध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी उपस्थित होते. कर्मचार्‍यांसाठी कान, नाक, घसा आणि दात तपासणीचे शिबिर घेतले. तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजार जडतात. हा धोका कर्मचार्‍यांच्या लक्षात आणून देत तंबाखूविरोधी जनजागृती केली जाणार आहे. यातून तंबाखूनियंत्रण कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्याचे सीपीएएच्या कार्यकारी अधिकारी संचालिका अनिता पिटर यांनी सांगितले.