Join us

राज्यात कोरोनाचे ५९, मुंबईत १४ नवे रुग्ण

By संतोष आंधळे | Updated: January 24, 2024 20:33 IST

दिवसभरात ३२३  चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये बुधवारी  राज्यात एकूण ५९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १४ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ३७७ आणि मुंबईत ११५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  तसेच आज ८१ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत जे १४  रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १७ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ३२३  चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्णमुंबई मनपा - १४ठाणे मनपा - १नवी मुंबई मनपा -९कल्याण डोंबिवली मनपा - १रायगड -२पनवेल मनपा - ८

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या