पंकज रोडेकर, ठाणेपाणीटंचाईने होरपळणा-या ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ५८५ कामांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी १२८ कामे पूर्ण झाली असून २०५ ठिकाणी पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. ११२ ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात असून यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यात १८३ कामांना मंजूरी दिली असून ४२ कामे पूर्ण झाली आहेत, तर ५४ ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील या सर्व कामांसाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही सर्व कामे झाल्यावर दरवर्षी पाणीटंचाईने होरपळणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे़
पाच तालुक्यांत पेयजल योजनेची ५८५ कामे
By admin | Updated: December 5, 2014 00:03 IST