Join us

५७ हजारांच्या बनावट नोटा जप्त

By admin | Updated: July 31, 2014 00:43 IST

पनवेल परिसरात बनावट नोटा बाळगणाऱ्या एका आरोपीस कामोठे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

कामोठे : पनवेल परिसरात बनावट नोटा बाळगणाऱ्या एका आरोपीस कामोठे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या नोटा चलनात वापरण्याचा डाव असल्याचे पोलिसांनी सांगितले व या पाठीमागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.मागील महिन्यामध्ये कामोठे येथील मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातून बारीक कोन शेख (१९) या आरोपीस १३ हजारांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांना शेख याचा आणखी साथीदार नवीन पनवेल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी शरीफ मुजावर शेख (२३) या आरोपीस नवीन पनवेलमधून अटक केली. त्याच्याकडे एक हजाराच्या ३५ नोटा आणि पाचशे रुपयांच्या ४४ नोटा अशा ५७ हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. आरोपी या नोटा दुकानात चलनात आणून त्या कलकत्त्याला पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता मुल्लेमवार यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)