Join us  

अडखळणाऱ्या एसटीला ५५० कोटींचा डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 2:23 AM

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटीच्या समस्यांबाबत बैठक झाली.

मुंबई : वाहतूक जवळपास बंद, महसुलात झालेली मोठी घट आणि तोट्यामुळे अडखळत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला ५५० कोटी रुपयांचा निधी देत शासनाने मंगळवारी दिलासा दिला. मार्चपासून लॉकडाऊनचा मोठा फटका महामंडळाला बसला असून कर्मचाऱ्यांचे पगार करण्यातही अडचणी येत आहेत. मार्चचा पगाराचा शासकीय आदेशानुसार एकच टप्पा देण्यात आला. त्यानंतर एका महिन्याचा पगार ५० टक्केच देण्यात आला तर एका महिन्याचा पगारच देता आला नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटीच्या समस्यांबाबत बैठक झाली. या बैठकीला परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील,वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटीला ५५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार असून पगारासाठीची रक्कम उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :बसचालकमुंबई