Join us

मुंबईत ५४० कोरोनाबाधितांची नोंद; १३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी थोडी घट दिसून आली. गुरुवारी ५४० बाधित रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी थोडी घट दिसून आली. गुरुवारी ५४० बाधित रुग्ण आढळून आले, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०८ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८५८ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख एक हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५८६ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ७१४ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांपैकी १२ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये सात पुरुष, तर सहा महिला रुग्णांचा समावेश होता. एक मृत रुग्ण ४० वर्षांखालील होता. १० मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३७ हजार ८०२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७४ लाख २३ हजार ४८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.