Join us
Daily Top 2Weekly Top 5

५४ मंडळांविरुद्ध होणार गुन्हे दाखल

By admin | Updated: October 4, 2015 02:35 IST

सार्वजनिक गणेशोत्सव काळात मंडप उभारताना उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून मंडप उभारण्याविषयी पालिकेने स्पष्ट केले होते. तथापि, महापालिका हद्दीतील

ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात मंडप उभारताना उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून मंडप उभारण्याविषयी पालिकेने स्पष्ट केले होते. तथापि, महापालिका हद्दीतील ५४ सार्वजनिक मंडळांनी महानगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज न करता मंडपांची उभारणी केली. अशा मंडळांना पालिकेने यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत पालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या मंडळांनी अर्ज न करता मंडप उभारणी केली आहे, त्या मंडळांविरु द्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ज्या १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत, त्या सर्व मंडळांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्ताने दिले असू याबाबत महसूल वसुली प्रमाणपत्र प्रक्रिया वापरून दंड वसूल केला जाणार आहे. (प्रतिनिधी)शनिवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गणेशोत्सवात परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज न करता मंडप उभारणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरु द्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्या मंडळांना पुढील वर्षी कसलीही परवानगी देण्यात येऊ नये, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.