नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या ५६८ उमेदवारांपैकी, स्वत:बद्दल माहिती देणाऱ्या ५३७ उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच सुमारे ३०४ उमेदवारांनी आयकर विवरणपत्राची कसलीही माहिती दिलेली नाही.देशभरातील विविध निवडणुकांतील उमेदवार, त्यांचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मालमत्तेविषयी विश्लेषण करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफॉर्मस् या संस्थेने नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अंतिम रिंगणात असलेल्या ५६८ उमेदवारांनी आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रांच्या आधारे हे विश्लेषण केले आहे.शपथपत्रात गुन्ह्णांची माहिती देणाऱ्या ५३ उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या १११ पैकी १७, शिवसेनेच्या ६१ पैकी ११, काँगे्रसच्या ८५ पैकी ७, भाजपाच्या ४२ पैकी ५ उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय शेकापच्या ३३ पैकी १, आरपीआय ११ पैकी १ आणि १७२ अपक्षांपैकी ११ अपक्ष उमेदवारांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती दिली आहे. असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतदारांपुढेही संभ्रम आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ५३ उमेदवार
By admin | Updated: April 20, 2015 01:16 IST