Join us

शिबिरात ५३ पिशव्या रक्त जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरिवली येथील भरत घाणेकर मित्र मंडळाने सरला ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरिवली येथील भरत घाणेकर मित्र मंडळाने सरला ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५३ पिशव्या रक्त जमा झाले.

बोरिवली पूर्व भागात मागाठाणे बस आगारासमोरील फुलपाखरू मैदानात भाजपचे कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या कार्यकर्त्यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भाजप खासदार गोपाळ शेट्टी, महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आदी अनेक मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

भरत घाणेकर मित्र मंडळाच्या बिपीन सावंत, लक्ष्मीकांत नाईक, अनिकेत नाईक, पार्थ नागदोरिया, जय पयेर, वरुण घाणेकर, अंकित धावरे, सदाशिव वर्मा, संस्कृती जाधव, अनिल जाधव आदी कार्यकत्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------