वैभव गायकर - पनवेलनवी मुंबई, पनवेलमध्येही आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ५२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १४ जणांना प्रत्यक्षात लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम व इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईपाठोपाठ नवी मुंबई, पनवेल परिसरामध्येही स्वाइनची साथ पसरू लागली आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ जणांना प्रत्यक्षात लागण झाली असून, इतर १९ जणांना प्रत्यक्षात लागण झाली नसल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. स्वाइन झालेल्यांमध्ये लीला गांधी (५८) पनवेल, कमला पाटील (५९) कामोठा, वेदिका काल्हेहर (अडीच वर्षे) खारघर, समीर पांडे (४८) खारघर , प्रद्युम्न तोमर (८) खारघर यांचा समावेश आहे. या रु ग्णांची नोंद पनवेल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. पनवेल ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार दिल्यानंतर एमजीएम, लीलावती दवाखान्यात या रु ग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी चार रु ग्णांना यशस्वी उपचार दिल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र लीला गांधी यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पनवेल ग्रामीण रुग्णालयामार्फत देण्यात आली. नवी मुंबईमध्ये आतापर्यंत २८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामधील ९ जणांना प्रत्यक्षात लागण झाली असल्याचे वैद्यकीय अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. उर्वरित २१ जणांना स्वाइन निष्पन्न झालेला नाही. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. च्महापालिकेने स्वाइनविषयी शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.महापालिका क्षेत्रात २८ संशयितांपैकी फक्त ९ जणांना प्रत्यक्षात स्वाइन झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पालिका प्रशासनाने साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर, मुख्याध्यापकांची कार्यशाळाही घेतली असून, जनजागृती मोहीम सुरू आहे. - डॉ. दीपक परोपकारी,मुख्य वैद्यकीय अधिकारी,पालिकानागरिकांनी स्वाइन फ्लूविषयी भीती बाळगू नये. औषधोपचाराने हा आजार बरा होतो. ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. - डॉ. बी. एस. लोहारे,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पनवेल,च् नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय मिळून २८ ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू केले आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, रुग्णालय मालक यांची कार्यशाळा सुरू केली आहे. मुख्याध्यापकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे.
स्वाइनचे ५२ संशयित रुग्ण
By admin | Updated: February 21, 2015 01:24 IST