Join us  

सीएसएमटीवर ५०० जणांनी केला ‘मुक्काम’; महिनाभरात स्लीपिंग पॉडचा प्रतिसाद वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 6:51 AM

प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत असून महिनाभरात ५०० हून अधिक प्रवाशांनी या पॉड सुविधेचा लाभ घेतला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवरचे अखेरचे स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी. याच स्थानकावरून संपूर्ण भारतात जाण्यासाठी अनेक गाड्याही सुटतात. अनेकदा या गाड्यांच्या वेळा अवेळी असतात. अशा वेळी प्रवाशांना स्थानकात किंवा रेल्वेच्या प्रतीक्षालयात ताटकळत बसावे लागते. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने अत्याधुनिक पद्धतीचे स्लीपिंग पॉड हॉटेल सुरू केले आहे. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद लाभत असून महिनाभरात ५०० हून अधिक प्रवाशांनी या पॉड सुविधेचा लाभ घेतला आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात १ जुलै २०२२ पासून अत्याधुनिक ४० स्लीपिंग पॉड असलेले हॉटेल सुरू झाले आहे. त्यात ३० सिंगल स्लीपिंग पॉड्स, सहा दुहेरी स्लीपिंग पॉड्स आणि चार फॅमिली स्लीपिंग पॉड्स आहेत. मध्य रेल्वेला या उपक्रमातून येत्या पाच वर्षांत ५५ लाख ६८ हजार रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. स्लीपिंग पॉडला महिना पूर्ण झाला असून प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. दररोज १५ ते २० प्रवासी या स्लीपिंग पॉडमध्ये विश्रांती घेतात. आतापर्यंत ५०० हून अधिक प्रवाशांनी स्लीपिंग पॉडमध्ये विश्रांती घेतली असल्याची माहिती स्लीपिंग पॉडच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.

महिन्यातून एकदा येतो प्रथमच स्लीपिंग पॉडमध्ये विश्रांती घेतली. तेव्हा रेल्वेने उघडलेली ही सुविधा अप्रतिम मला वाटली. मात्र, आता १२ टक्के जीएसटी स्लीपिंग पॉडच्या दरात आकारली जात आहे. ४९९ वरून आता आम्हाला ५५८ रुपये स्लीपिंग पॉडसाठी मोजावे लागत आहेत.     - योगेश घुले,  प्रवासी

जीएसटीमुक्त कराकेंद्र आणि राज्य सरकारने रेल्वे स्थानकावर असलेल्या सुविधा जीएसटी मुक्त कराव्यात. जेणेकरून प्रवाशांना स्थानकांवर उपलब्ध असलेल्या सुविधा मुबलक दरात उपलब्ध होतील. रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी हे गोरगरिबांपासून ते सामान्य आहेत. त्यामुळे सरकारने यावर विचार करावा. - रवींद्र वालकोळी,प्रवासी

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबईहॉटेल