Join us

५० टक्के महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित, सर्वेक्षणातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:50 IST

सर्वेक्षणातील आकडेवारी, ५० टक्के महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित

मुंबई : सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेमधील प्रवास सुरक्षित नसल्याचा दावा रेल्वे प्रवास करणाºया सुमारे ५० टक्के महिलांनी केला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)ने एका खासगी संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाºया महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी)द्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ साठी कर्ज मिळविण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. एमयूटीपी ३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण आणि पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्ग हे दोन प्रकल्प आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते डहाणू आणि मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ ते कर्जत या स्थानकांदरम्यान प्रवास करणाºया महिला प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. दररोज धक्काबुक्की, भांडणे, महिला डब्यांवर दगडफेक, अश्लील चाळे अशा घटनांना सामोरे जाऊन महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच पश्चिम रेल्वे मार्गावरील ४५ टक्के आणि मध्य रेल्वे मार्गावर ४० टक्के महिलांनी आमचा रेल्वे प्रवास सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. महिलांना विनयभंग करणाऱ्या समाजकंटकांचा सामना करावा लागतो. १० पैकी ४ महिलांना अशा घटनांना सामोरे जावे लागते. यापैकी २७ टक्के महिला असे प्रसंग घडल्याचे कोणाला सांगत नाहीत. फक्त ६० टक्के महिला रेल्वे पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करतात. १३ टक्के महिला हेल्पलाइनचा आधार घेतात. महिला डब्यांमध्ये महिला पोलीस असाव्यात, अशा सूचना सर्वेक्षणात महिलांनी केल्या.

पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते डहाणूपर्यंतदेखील महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासात असुरक्षित वाटते. विरार, पालघर, वैतरणा स्थानकांतून प्रवास करणाºया महिलांचा प्रवास धोक्याचा आहे. समाजकंटकांकडून महिला प्रवाशांना त्रास होतो, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ ते कर्जतदरम्यान गर्दीच्या वेळी महिलांना लोकलच्या Þडब्यात बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे दररोज उभे राहून रेल्वे प्रवास करावा लागतो. पश्चिम रेल्वे मार्गावरील महिलांना रेल्वे स्थानकावरील, परिसरातील फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागतो, असे मत महिला प्रवाशांनी दिले. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सर्वेक्षणात महिला प्रवाशांचे १८ ते २५, २६ ते ४० आणि ४१ वयोगटांवरील असे तीन गट करण्यात आले. सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६.३० ते ९ अशा गर्दीच्या वेळी महिलांशी चर्चा करण्यात आली. एकूण १ हजार ९ महिलांशी चर्चा करून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील ८६८ आणि मध्य रेल्वे मार्गावरील १४२ महिला प्रवाशांशी संवाद साधण्यात आला.

सोयीसुविधा पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे सकारात्मक नकारात्मक सकारात्मक नकारात्मकस्वच्छतागृह ८८ ७ ४१ ५४पिण्याचे पाणी ६८ २८ ९९ १तिकीट खिडक्या ८२ १८ ७१ २९एटीव्हीएम ७९ ९ ६७ ८इंडिकेटर ४१ ५९ ११ ८९स्टेशनला सहज येणे ९७ ३ ९५ ५एक्सलेटर ११ - ९२ -पायºया ९६ ४ ९९ १रॅम्प ६६ १ ७० -पॅनिक बटण ९३ ७ ९४ ६विद्युतव्यवस्था(दिवसा) ३० २० ४१ १७विद्युतव्यवस्था(रात्री) २३ ११ ५६ ६स्थानकातील उद्घोषणा ३२ ६८ ६ ९४

टॅग्स :लोकलमुंबई