Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टोरंटला ५०; तर हॉटेलला ४० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:10 IST

मुंबई : राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के ग्राहक क्षमतेने खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. ...

मुंबई : राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के ग्राहक क्षमतेने खुली ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत रेस्टॉरंटला ५०, तर हॉटेलला ४० टक्के प्रतिसाद मिळाला, अशी माहिती हॉटेल संघटनांनी दिली.

वेळेत वाढ करावी

रेस्टोरंट आणि बारसाठी रात्रीची जेवणाची वेळ १० पर्यंत ठेवण्यात आली आहे. मुंबईत साधारण कामावरून घरी जाण्यास रात्री ८ वाजतात. जेवणासाठी बाहेर जायचे असेल तर ९.३० होतात. रेस्टॉरंट आणि बारमध्ये जाऊन अर्ध्या तासात ऑर्डर देऊन जेवण करणे शक्य नाही. अनेक जण बाहेर जेवायला जाण्याचे टाळत आहेत. ५० टक्के क्षमतेचा नियम आम्ही पाळत आहोत, पण रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याची वेळ मर्यादा १.३० पर्यंत करावी.

- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष , आहार

हॉटेलमध्ये गर्दी टाळण्यासाठी बुकिंगसाठी स्लॉट तयार करण्यात आले आहेत. रविावारी सायंकाळपर्यंत ३५ ते ४० टक्के बुकिंग करण्यात आले आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रात्रीपर्यंत बुकिंगमध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

- गुरबक्षसिंग कोहली, उपाध्यक्ष, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया