Join us  

गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:12 AM

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ५०.६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ५०.६१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मार्फत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. बुधवारी नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी काही महिन्यांपुर्वी पत्र पाठविले होते. त्यानुसार सिडकोला ५०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करूण दिला जाणार आहे. औरंगाबाद येथील या स्मारकाचे काम सिडकोकडे देण्यात आले आहे. तर, स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी औरंगाबाद महापालिकेकडे असणार आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीनंतर सिडकोने सदर स्मारक औरंगाबाद महापालिकेकडे सोपवायचा आहे. याबाबत सिडको आणि महापालिकेने आवश्यक करार करावा, असेही या जीआरमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :गोपीनाथ मुंडे