Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारसांना पोलीस भरतीत 5 टक्के आरक्षण

By admin | Updated: August 21, 2014 01:53 IST

पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2क्11च्या पोलीस भरतीमध्ये निवड केलेल्या; परंतु अद्याप नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार असून शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना गणवेशभत्ता देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.
अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी 3 टक्के आरक्षण हे कर्मचा:यांच्या पाल्यासाठी पोलीस भरतीत राखीव ठेवण्यात येईल. तर, 2 टक्के आरक्षण हे सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपातत्त्वावर नियुक्तीसाठी राखीव असेल. तसेच 2क्11मध्ये पोलीस भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणात एकूण 529 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. निवड याद्या सुधारित केल्यानंतर सेवेत नियुक्त केलेल्या व सेवेतून कमी केलेल्या 158 उमेदवारांना पोलीस सेवेत घेण्यात येईल. तसेच नियुक्त न मिळालेल्या उर्वरित 371 उमेदवारांनाही कारागृह सेवेमध्ये सामावून घेण्याचा पर्याय देण्यात येईल.
गणवेश भत्ता देणार
पोलिसांना गणवेशाशी संबंधित 56 प्रकारचे साहित्य खरेदी करून देण्यात येते. परंतु हे साहित्य एकाच वेळी उपलब्ध होत नसल्याने अडचणी येतात. म्हणून यापैकी 25 बाबींसाठी गणवेश भत्ता देण्याचा आणि उर्वरित 31 बाबी प्रचिलत पद्धतीनुसार खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)
 
च्दहावी तसेच दहावीनंतरचे शिक्षण घेणा:या अपंग विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या योजनेचा लाभ 32 हजार 344 विद्याथ्र्याना मिळेल. 
च्पहिली ते चौथीर्पयतच्या विद्याथ्र्याना दरमहा 5क् रुपयांऐवजी आता 1क्क् रुपये देण्यात येईल. इतर गटातील वाढ पुढीलप्रमाणो - पाचवी ते सातवी  (सध्याचे दर 75 रुपये) 15क् रु पये, आठवी ते दहावी (सध्याचे दर 1क्क् रुपये) 2क्क् रुपये. अपंगांच्या कार्यशाळेसाठी सध्या कुठलीही रक्कम देण्यात येत नाही.  ती आता दरमहा 3क्क् रु पये देण्यात येईल. 
 
च्मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणा:या निवासी आणि अनिवासी विद्याथ्र्याना देण्यात येणा:या दरातही वाढ करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणो :- गट अ निवासी विद्यार्थी (सध्याचे दर दरमहा 425 रु.) 12क्क् रुपये. गट ब आणि क (सध्याचे दर दरमहा 29क् रु.) 82क् रु. गट ड (सध्याचे दर दरमहा 23क् रु.) 57क् रु. गट इ (सध्याचे दर दरमहा 15क् रु.) 38क् रु. अनिवासी विद्याथ्र्यासाठी वाढीव दर पुढीलप्रमाणो आहे :- गट अ अनिवासी विद्यार्थी (सध्याचे दर दरमहा 19क् रु.) 55क् रु. गट ब आणि क (सध्याचे दर दरमहा 19क् रु.) 53क् रु. गट ड (सध्याचे दर दरमहा 12क् रु.) 3क्क् रु. गट इ (सध्याचे दर दरमहा 9क् रु.) 23क् रु.
 
नक्षलग्रस्त भागातील विविध विकासकामे तातडीने होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समिती तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन  करण्याचा निर्णय  घेण्यात आला. नक्षलग्रस्त भागात विकासकामे करताना ब:याच वेळा प्रशासकीय मान्यता मिळण्यास आणि निधी उपलब्ध होण्यास विलंब होतो. परिणामत: हा निधी व्यपगत होऊ नये म्हणून या समित्या नेमण्यात आल्या.
 
सर्वसमावेशक हातमाग 
विकास योजना राबविणार
च्केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक हातमाग विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी  करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 12व्या पंचवार्षिक योजनेत ही योजना राबविण्यात येईल. 
च्केंद्राकडून 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेतील हातमाग विकास योजनांच्या महत्वाच्या घटकांचे विलिनीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे. हातमागांचा एकात्मिक आणि व्यापक विकास, विणकरांचे कल्याण यावर आधारित या योजनेत नवीन समूह निर्माण करणो, विपणनाला प्रोत्साहन देणो, हातमाग विपणन सहाय्य, हातमाग संस्थांचा विकास करणो अशी कामे केली जातील.