ठाणो : ऑक्टोबरच्या तिस:या आठवडय़ात शासकीय कर्मचा:यांनी सुटय़ांची जबरदस्त लयलूट केली. ती कमी झाली म्हणून की काय, येत्या नोव्हेंबरच्या 1क् दिवसांत कर्मचा:यांना दिवसाआड सुटी उपभोगण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील कामकाज पुन्हा मंदावणार आहे.
1 नोव्हेंबरचा शनिवार गेला की रविवारची सुटी, 3 तारखेचा सोमवार गेला की मंगळवारी 4 तारखेला मोहरमची सुटी, 5 तारीख गेली की गुरुवारी 6 तारखेला गुरुनानक जयंतीची सुटी, शुक्रवार गेला
की शनिवारी सेकंड सॅटर्डेची सुटी आणि लगेच 9 नोव्हेंबरला रविवार असल्याने ती सुटी. म्हणजे आठ दिवसांत पाच सुटय़ा अशी अवस्था आहे.
अनेक चाकरमानी या पाच दिवसांच्या सुटीचे रूपांतर आठ दिवसांच्या सुटीत करण्यासाठी हुकुमी आजारी पडण्याच्या तंत्रचा वापर करण्याची शक्यता आहे. बँकांचे व्यवहार यामुळे थंडावण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)