Join us  

राज्यातील १४ महाविद्यालयांना १४ कोटींचा ‘रुसा’ निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:43 AM

मुंबईतील सहा महाविद्यालये

मुंबई : केंद्राच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील १४ स्वायत्त महाविद्यालयांना राज्याच्या हिश्शाचा ४०% निधी वितरित करण्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. याआधी केंद्राचा हिस्सा (६० %) २१ कोटी रुपये उपलब्ध करून उर्वरित राज्याचा हिस्सा (४०%) म्हणजे १४ कोटी असे एकूण ३५ कोटी वितरित करण्यात येणार होते. यामध्ये राज्यातील १४ शैक्षणिक संस्थांचा तर मुंबईतील ६ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.रुसा अंतर्गत राज्यातील ज्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे त्यांना ‘रुसा’अंतर्गत मंजूर झालेला निधी हा अध्ययन व अध्यापन, संशोधन अभ्यासक्रम तयार करणे आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी वापरता येईल. या मंजूर निधीपैकी ६० टक्के हिस्सा ‘रुसा’चा, तर ४० टक्के राज्य सरकारचा असेल. त्यापैकी आता राज्य सरकारचा हिस्सा असलेला निधी या शैक्षणिक संस्थांना वितरित केला जाणार असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. स्वायत्त महाविद्यालयांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्यातील केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे हे वितरण असेल. यामध्ये मुंबईतील ६ महाविद्यालयांचा समावेश असून राज्याच्या हिश्शापोटी प्रत्येक महाविद्यालयाला १ कोटी रुपये मिळतील. डॉ. नानावटी महाविद्यालय, खालसा महाविद्यालय, हंसराज महाविद्यालय, पाटकर महाविद्यालय, आर. ए. पोदार महाविद्यालय आणि निर्मला निकेतन महाविद्यालय यांचा समावेश मुंबईतील यादीत आहे. तर वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील आणि पनवेलच्या चंगू काना ठाकूर महाविद्यालयाचा समावेशही या निधी वितरित करणाºया महाविद्यालयांच्या यादीत आहे.राज्यातील या महाविद्यालयांना मिळणार निधी : छत्रपती शिवाजी महाविद्यालय - सातारा] सर परशुराम महाविद्यालय - पुणे, तुळजाराम महाविद्यालय - बारामती, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय - कराड, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय - पंढरपूर, प्रताप महाविद्यालय - जळगाव.