Join us  

मुंबईत १७५६ कोरोना रु ग्ण, सोमवारी २0४ रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 5:28 AM

कोरोना वेगाने पसरतोय : ११ मृत्यूंची नोंद, एकूण बळी ११२

मुंबई : राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना रु ग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १७५६ कोरोना रु ग्ण असून मंगळवारी २0४ नवे रु ग्ण आढळले आहेत. तर शहर उपनगरात मंगळवारी ११ मृत्यूंची नोंद झाली त्यामुळे मृतांचा आकडाही ११२ वर पोहोचला आहे. शहरातील वाढते संसर्गाचे संक्र मण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नवे मार्ग अवलंबिले जात आहे.

मुंबईत ५ ते १३ एिप्रल पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशियत कोरोना रु ग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ९0 क्लिनिक्समध्ये ३५१८ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी १३८४ संशियतांचे नमुने घेण्यात आले. मुंबईतील एकूण कोरोना रु ग्णांपैकी ७८१ कोरोना रु ग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि सर्वेक्षण अंतर्गत कोविड संशियत रु ग्णांचा शोध या अंतर्गत सापडले आहेत. मुलुंड येथील फोर्टिस रु ग्णालयात सोमवारी तीन कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात ४२ वर्षीय महिलेसह तिची ६९ वर्षीय आई आणि १५ वर्षीय मुलाने संसर्गावर मात केली आहे आणि ते पूर्णपणे बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने त्यांना घरगुती अलगीकरणाबाबत समुपदेशन केले आहे.कूपर रुग्णालयात रुग्णाची परिचारिकेला मारहाणकूपर रु ग्णालयात उपचारांसी दाखल झालेल्या गर्भवती रुग्णाने डिस्चार्ज नाकारल्यामुळे संतप्त होऊन परिचारिकेला मारहाण केली आहे. यावेळी, मारहाण करण्यापासून गर्भवतीचा पतीही रोखत होता, मात्र रुग्ण कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. याविषयी, बुधवारी रितसर तक्रार नोंदविण्यात येईल असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.टीबी रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाइनशहरात वेगाने पसरणाºया कोरोनाने आता टीबी रुग्णालयातही शिरकाव केला आहे. या रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांना घरगुती अलगीकरण ( होम क्वारंटाइन) सांगितले आहे. यात दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि दोन वॉर्डबॉयचा समावेश आहे. मुंब्रा येथील कोरोना रु ग्णाला ३ एप्रिल रोजी शिवडीच्या क्षयरोग रु ग्णालयात आणले होते. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील कर्मचाºयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना अलगीकरण सांगितले आहे.११ मृत्यूंची नोंद, बळींचा आकडा ११२ वरशहर उपनगरात मंगळवारी ११ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यापैकी एक मृत्यू मंगळवारी झाला असून अन्य पाच मृत्यू सोमवारी, तीन मृत्यू १२ एप्रिल, दोन मृत्यू ९ एप्रिल रोजी झाले आहेत. या अकरा मृत्यूंपैकी नऊ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते, तर दोन मृत्यू वार्धक्यामुळे झाले आहेत. दीर्घकालीन आजारांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, स्थूलता, हृदयविकार, अस्थमा यांसारखे आजार आहेत. तर एका रुग्णाला क्षयरोगही होता. अकरा मृत रुग्णांमध्ये आठ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. यातील सायन, वांद्रे भाभा, कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी दोन रुग्णांचा तर ग्लोबल, राजावाडी , केईएम रु ग्णालयात प्रत्येकी एक रु ग्णाचा मृत्यू झाला आहे.च्राज्यात मंगळवारी झालेल्या मृत्यूमध्ये ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूंपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. दोघे जण ४० वर्षांखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ७२ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे.च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात आजमितीस एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ६७,७०१ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.मंगळवारी भरती झालेले संशियत रु ग्ण ३८५एकूण भरती झालेले संशियत रु ग्ण ५११८मंगळवारी निदान झालेले रु ग्ण २0४एकूण पॉझििटव्ह रु ग्ण १७५६मंगळवारी झालेल्या मृत रु ग्णांची नोंद ११एकूण मृतांची संख्या ११२मंगळवारी कोविडमधून मुक्त झालेले रुग्ण २३कोविड आजारातून मुक्त झालेले रु ग्ण १६४

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई