मुंबई : राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ४ हजार ९३० रुग्णांचे निदान झाले असून ९५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार २४६ आहे. दिवसभरात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के झाले असून मृत्यूदर २.५८ टक्के आहे.
सध्या ८९ हजार ९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर ६ हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
...........................