Join us

अंबरनाथमध्ये ४९; बदलापुरात ५६ टक्के

By admin | Updated: April 22, 2015 22:55 IST

या दोनही नगरपरिषदांच्या निवडणुकांत भर उन्हातही बुधवारी मतदारांनी भरभरून मतदान केले. सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी ४ नंतर मतदान

अंबरनाथ/बदलापूर : या दोनही नगरपरिषदांच्या निवडणुकांत भर उन्हातही बुधवारी मतदारांनी भरभरून मतदान केले. सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी ४ नंतर मतदान केंद्रांवर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अंबरनाथमध्ये सरासरी ४९ तर बदलापुरात सरासरी ५६ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा हा आकडा कोणत्या पक्षाला फायदेशीर राहील, हे गुरुवारी मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)