Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काेराेनाचे ४३ हजार सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १९ लाख २३ हजार १८७ रुग्ण काेराेनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के झाले आहे. सध्या ४३,०४८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी दिवसभरात २ हजार ८८९ रुग्णांचे निदान झाले असून ५० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २० लाख १८ हजार ४१३ झाली असून मृतांचा आकडा ५० हजार ९४४ झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४४ लाख ३० हजार २२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.९९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ९७ हजार ९४१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २ हजार ८०४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

...................